Investment In Foreign with Single Fund

By- महाराष्ट्र टाइम्स.कॉम Updated: 03 Jul 2021, 03:17:00 PM

परदेशी बाजारात गुंतवणूक संधी; एकाच फंडांच्या माध्यमातून करा अमेरिका, जपान, हाॅंगकाॅंग बाजारात गुंतवणूक

Icici Prudential Global Advantage Fund(FOF)

सध्या जागतिक बाजारपेठेत भारतीय गुंतवणूकदारांची रुची वाढली आहे. म्हणूनच देशातील म्युच्युअल फंड कंपन्या या बाजारांत आपल्या योजना लॉन्च करत आहेत. जागतिक बाजारपेठेत अनेक आव्हानेही आहेत. म्हणूनच गुंतवणूकदारांनी या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होऊन लाभ प्राप्त होतो.

मुंबई : देशातील जे छोटे आणि किरकोळ गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी परदेशी बाजारात थेट गुंतवणूक करणे अवघड असते. अशा गुंतवणूकदारांनी एकाच फंडाच्या माध्यमातून सर्व बाजारांमधील गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंडाचा मार्ग निवडायला हवा. याद्वारे भारतात अद्याप सूचिबद्ध नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होईल.

देशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या ग्लोबल ऍडव्हान्टेज फंडाच्या माध्यमातून अमेरीका, जपान, हाँगकाँग यांसारख्या विभिन्न मोठ्या बाजारात गुंतवणूक करता येईल. हा फंड तेथील बाजारांत आधीपासूनच उपस्थित फंडांमध्ये गुंतवणूक करतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या ग्लोबल ऍडव्हान्टेज फंडाचा पोर्टफोलिओ पाहिल्यास याच्या एकूण गुंतवणुकीपैकी २६ टक्के गुंतवणूक ही अमेरिकी ब्लूचिप इक्विटी फंडात आहे. तर निप्पोन इंडिया ईटीएफ हाँगकाँगमध्ये २५.४ टक्के, फ्रँकलिन एशियन इक्विटी फंडात २१.५ टक्के, निप्पोन जपान इक्विटी फंडात २०.९ टक्के गुंतवणूक आहे.

शाप्रकारच्या गुंतवणुकीद्वारे चांगला लाभ मिळतो. या ग्लोबल ऍडव्हान्टेज फंडाने २२.८३ टक्के चक्रवृद्धी व्याज (सीजीएआर) दराने परतावा दिला आहे. याचा अर्थ एखाद्या गुंतणूकदाराने ऑक्टोबर २०१९ मध्ये या फंडात १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असेल तर मे २०२१ मध्ये ती रक्कम १४,०३७ रुपये झाली असेल. हा फंड ऑक्टोबर २०१९ रोजी लॉन्च करण्यात आला होता.


या ग्लोबल ऍडव्हान्टेज फंडाच्या पोर्टफोलिओवर नजर टाकल्यास असे आढळते की याची ५१% गुंतवणूक ही उदयोन्मुख बाजारपेठेत तर ४९% गुंतवणूक विकसित बाजारपेठेमध्ये आहे. या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना उदयोन्मुख आणि विकसित अशा दोन्ही बाजारपेठेत गुंतवणुकीची संधी प्राप्त होते. फंड ऑफ फंडच्या संरचनेत असलेल्या योजनांमध्ये तो गुंतवणूक करतो. यात फंड व्यवस्थापकाकडे सर्व भौगोलिक क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असते आणि ते विविध बाजारांतील आउटलुकमधील बदलांनुसार यात बदल करू शकतात.

जेव्हा विकसित बाजारपेठेचा दृष्टीकोन सकारात्मक असतो तेव्हा हा फंड त्या बाजारात गुंतवणूक करतो. विकसित बाजारांमध्ये अमेरिका, जपान आदी देशांचा समावेश आहे. तर दुसरीकडे जेव्हा उदयोन्मुख बाजारपेठा चांगली कामगिरी करतात तेव्हा हा फंड त्यात गुंतवणूक करतो. यात आशियासह जपानचा समावेश आहे. अशाप्रकारे किरकोळ गुंतवणूकदारांना जगभरातील बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हे एक वन स्टॉप सोल्यूशन आहे.

परदेशी बाजारात सूचिबद्ध होणा-या कंपन्या भारतात नसल्याने परदेशी बाजाराचे आकर्षण वाढले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास ई-कॉमर्स, डिजिटल प्लॅटफॉर्म, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रातील कंपन्या परदेशी बाजारात सूचिबद्ध असून गेल्या काही वर्षांत या बाजारांनी चांगला परतावा देखील दिला आहे.

By- Shrikant Malewar

MD&CEO, Malewar Mutual Fund Services

About The Author

Scroll to Top